Responsive image
फडके सर कार्यशाळा घेताना

‘अरुण फडके – मराठी लेखन मार्गदर्शन’ यूट्यूब वाहिनी

‘अरुण फडके – मराठी लेखन मार्गदर्शन’ ह्या यूट्यूब वाहिनीद्वारे आम्ही एक नवा उपक्रम घेऊन येत आहोत. शुद्धलेखनाच्या कार्यशाळा घेणारे श्री. अरुण फडके ह्यांच्या एका कार्यशाळेचे चित्रीकरण जानेवारी २०२० मध्ये केले होते. ह्या चित्रीकरणासाठी श्री. केयूर करंबेळकर यांनी पुढाकार घेतला होता. त्या कार्यशाळेत त्यांनी ‘चकवा शब्दांचा… मैत्री शुद्धलेखनाशी’ ह्या शीर्षकाखाली जे शब्द समजावून सांगितले होते, ते शब्द ६ ते १० मिनिटांच्या छोट्याछोट्या भागांत विभागून ह्या वाहिनीद्वारे दर शनिवारी प्रकाशित करायचे ठरवले आहे. श्री. सचीन देशपांडे ह्यांनी अरुण फडके यांचे हे संकेतस्थळ आणि युट्यूब वाहिनी तयार करण्यासाठी मदत केली आहे. शुद्धलेखनाचा प्रचार आणि प्रसार ह्या ध्येयाने श्री. अरुण फडके ह्यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली होती. त्याच उद्दिष्टाने आम्ही हा उपक्रम सुरू करतो आहोत. मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला हा उपक्रम नक्कीच आवडेल. तुम्हांला हा उपक्रम आवडला, तर तुम्हीही ह्या वाहिनीचा प्रचार करा, प्रसार करा. धन्यवाद !

युट्युब वाहिनी लिंक...

अरुण फडके स्मृतिदिना निमित्त कार्यक्रामचे रेकॉरर्डींग



महाराष्ट्र राज्याचे भाषाविषयक धोरण - काही ठळक बाबी

महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ‘महाराष्ट्र राज्याचे पुढील २५ वर्षांसाठीचे मराठी भाषाविषयक धोरण २०१४’ ह्या विषयांतर्गत धोरणमसुदा दिला आहे. त्या अनुषंगाने ह्या धोरणात माझ्या दृष्टीने कोणत्या ठळक बाबी असाव्यात त्यांचा थोडक्यात ऊहापोह करीत आहे.


भाषास्वातंत्र्य - मुक्तता आणि मर्यादा

कोणत्याही गोष्टीचे स्वातंत्र्य म्हणजे ती गोष्ट हवी तेव्हा हवी तशी करायला मिळणे - असा सर्वसाधारण अर्थ घेतला जातो. प्रत्यक्षात मात्र असे शंभर टक्के मुक्त स्वातंत्र्य कोणत्याच गोष्टीत कोणालाही नसते.